Ad will apear here
Next
‘भाजपने साधला समाजिक समतोल’
मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी  नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे,’ अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.

सांगली महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपने स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले, ‘आगामी महापालिकेवर भाजपचेच वर्चस्व राहणार असून, महापौरही भाजपचाच असेल. देशात, राज्यात आणि आता सांगली महापालिकेतही भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, याबद्दल विश्वास आहे.’

‘केंद्रात आणि राज्यात आमच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांना सत्तेतील योग्य वाटा देण्याचे आमच्या पक्षाचे धोरण राहिले आहे. त्याच धर्तीवर सांगलीतही रिपाई आठवले गट आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत स्वाभिमानी संघटनेला योग्य ते प्रतिनिधीत्व उमेदवारीमध्ये देण्यात आले आहे’, असेही ते म्हणाले.

‘महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत बाेलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले की, भाजपच्या विजयाच्या धडाक्याने विरोधक चांगलेच बिथरले असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत; मात्र सांगलीकर यंदा विरोधकांचे मनसुबे उधळून लावतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उमेदवारी देताना भाजपने सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचे धोरण असल्याचे भाष्य भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी केले आहे. त्यानुसार उमेदवारी देताना महिला आणि युवा वर्गाला चांगले प्राधान्य देण्यात आले आहे; तसेच मुस्लीम समाजातील नऊजणांना उमेदवारी देत सामाजिक समतोल साधला गेला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारांमध्ये डॉक्टर्स, वकील अशा उच्चशिक्षितांसोबतच उद्योजक आणि युवकांचाही समावेश करण्यात आला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTBBQ
Similar Posts
वैदिक गणित प्रावीण्य परीक्षा सांगली : पारिजात अॅकॅडमीतर्फे प्रथमच वैदिक गणित प्रावीण्य परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्णपणे वैदिक गणितावर आधारित असलेली ही परीक्षा २५ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. प्रथमच होणाऱ्या या परीक्षेसाठी सांगली, मिरज, कुपवाड येथे वैदिक गणित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. येथील महानगरपालिका
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
‘मुख्यमंत्री सचिवालयातील आदरातिथ्यावरील खर्च पूर्वीसारखाच’ मुंबई : ‘मुख्यमंत्री सचिवालयात आदरातिथ्यावर केलेल्या दरवर्षीच्या खर्चाची आकडेवारी पाहिली, तर ही सरासरी आधीच्या सरकराच्या कार्यकाळात होती तशीच आहे. असे असताना काँग्रेसचे बेताल नेते संजय निरूपम हे बरळतात आणि त्याचीच री महाराष्ट्रातील ‘जाणते’ नेतृत्त्व म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते सन्माननीय शरद पवारही
‘देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language